श्रीरामकृष्ण चरणाश्रित (Sri Ramakrishna Charanashrit)

SKU EBM214

Contributors

Swami Avadhutananda, Swami Chetanananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

437

Description

भगवान श्रीरामकृष्ण म्हणत असत की, कमळ उमलले की भुंगे आपोआपच कमळातील मकरंद आस्वादण्यासाठी कमळाकडे उडत येतात. तसेच जेव्हा एखाद्या महात्म्याचे हृदयकमळ उमलते, त्याला ईश्वरलाभ होतो तेव्हा खरेखुरे धर्मपिपासू त्याच्याकडे आकर्षित होतात. श्रीरामकृष्णांचे जीवन लोकोत्तर व विलक्षण होते. ते आनंदमय पुरुष होते, पुरुषोत्तम होते, युगपुरुष होते. त्यांच्या जीवन-सौरभाने आकर्षित होऊन संसारतापाने परितप्त झालेले अगणित लोक शांती व आनंद प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तसेच खरे खरे मुमुक्षू व भक्त त्यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी, अनुभव प्राप्त करण्यासाठी येत असत. त्यांपैकी काही अनुगत, निष्ठावान भक्त त्यांचे शिष्य झालेत व त्यांची कृपा लाभून धन्य झालेत. अशा काही शिष्यांची जीवने येथे वर्णिली आहेत. जे काही भक्त त्यांच्या संस्पर्शात येऊनही त्यांचे शिष्य झाले नाहीत परंतु त्यांनी श्रीरामकृष्णांची थोरवी ओळखली होती व त्यांची सेवा केली होती अशा भाग्यवान भक्तांची सुद्धा चरित्रे या पुस्तकात रेखाटली आहेत. सेंट लुई, येथील केंद्राचे प्रमुख स्वामी चेतनानंद यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे हे मराठी भाषांतर रामकृष्ण मिशन, मुंबईच्या सकवार येथील उपशाखेमध्ये कार्यरत असलेले स्वामी अवधूतानंद यांनी केले आहे. सर्व स्तरांवरील लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, सदाचारी व दुराचारी लोकांचा उद्धार करण्यास्तव श्रीरामकृष्णांचा आविर्भाव झाला होता. श्रीरामकृष्णांच्या संस्पर्शात आलेल्या भक्तांच्या जीवनांचा प्रभाव आजही तत्सदृश संवेदनशील वाचकावर पडतो.

Contributors : Swami Chetanananda, Swami Avadhutananda