Description
अमेरिकेत आणि इतर पाश्चात्त्य देशांत वेदान्ताचा प्रचार केल्यानंतर स्वामी विवेकानंद 1897 साली जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांनी विभिन्न ठिकाणी अनेक व्याख्याने दिली. त्यावेळी त्यांनी मद्रास येथील व्हिक्टोरिया हॉलमध्ये ‘My Plan of Campaign’ या विषयावर एक सविस्तर व्याख्यान दिले. प्रस्तुत पुस्तक हा त्या इंग्रजी व्याख्यानाचा अनुवाद आहे. आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय उन्नतीसाठी कोणते रचनात्मक आदर्श आवश्यक आहेत व भारतीयांचे पुनरुत्थान होण्यासाठी कोणत्या कार्यप्रणालीची गरज आहे याचे उद्बोधक विवेचन स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत व्याख्यानात केले आहे. आपल्या धर्माचे व आपल्या संस्कृतीचे जे चित्रण व जे विश्लेषण स्वामीजींनी या व्याख्यानात केले आहे ते अत्यंत स्फूर्तिदायक असून नवभारताला त्याच्यापासून खचित मार्गदर्शन लाभेल.
Contributors : Swami Vivekananda, S. V.Atre