स्वामी विवेकानंद आणि सर्वधर्मपरिषद – १८९३ (Swami Vivekananda Ani Sarvadharma Parishad – 1893)

SKU EBM270

Contributors

Dr. Shanta Kothekar, Laxminiwas Jhunjhunwala

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

125

Print Book ISBN

9789353180881

Description

अमेरिकेतील शिकागो शहरात इ.स. १८९३ मध्ये जागतिक स्तरावर सर्वधर्मपरिषद झाली होती. तिची शताब्दी इ.स. १९९३ मध्ये संपूर्ण भारतात तसेच जगात अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली होती. आता या वर्षी या सर्वधर्मपरिषदेला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने ‘स्वामी विवेकानंद आणि सर्वधर्मपरिषद’ नावाचे हे प्रकाशन वाचकांसमोर ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. स्वामीजींच्या जीवनामध्ये आणि भारताच्या इतिहासात या सर्वधर्मपरिषदेला अतिशय महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. स्वामीजींनी येथूनच पाश्चात्त्य देशांत धर्मप्रचार करण्याचा शुभारंभ केला.
श्री. लक्ष्मीनिवास झुंझुनवाला यांनी सर्वधर्मपरिषदेची प्रयत्नपूर्वक माहिती जमवून या ग्रंथाची रचना केली आहे. तत्कालीन भारतवर्षाची आणि पाश्चात्त्य देशाची स्थिती यांचा थोडक्यात आढावा त्यांनी घेतलेला आहे. यावरून स्वामी विवेकानंदांना हे कार्य करण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागला हे दिसून येते. यामुळेच त्यांनी प्राप्त केलेल्या यशाला सुवर्ण झळाळी मिळालेली आहे.
मूळ हिंदी पुस्तकाला उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल मा. श्री. विष्णुकांत शास्त्री यांनी शुभेच्छा व्यक्त करणारा संदेश पाठविला होता. त्याचाही अनुवाद प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वधर्मपरिषदेच्या प्रत्येक दिवसाच्या कार्यवाहीचे सार आपल्याला समजून येते. स्वामीजींनी केलेल्या सर्वधर्मसमन्वयाच्या आवाहनाचे महत्त्व सध्याच्या काळात आपल्याला अधिकच जाणवते.

Contributors : Laxminiwas Jhunjhunwala, Dr. Shanta Kothekar