Description
मनाची एकाग्रता हेच कोणत्याही प्रकारचे शिक्षण प्राप्त करून घेण्याचे प्रमुख माध्यम आहे. मनाची अशी एकाग्रता कशाप्रकारे वाढवता येईल असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामधे सतत घोळत असतो. सुविज्ञ लेखक स्वामी पुरुषोत्तमानंदजी हे सध्या बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव आहेत. त्यांनी ह्या आपल्या छोट्याशा पुस्तिकेमधे या काही रहस्यांचे उद्घाटन केले आहे. बंगलोर येथील रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेल्या ‘Secret of Concentration – For Students’ या मूळ इंग्रजी पुस्तिकेचा अनुवाद आहे. ‘‘एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे; तिच्या अभावी काहीच करता येणार नाही.’’ असे स्वामी विवेकानंद म्हणतात. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी मन एकाग्र कसे करावे, याचे दिग्दर्शन या पुस्तिकेत लेखकाने केले आहे. प्रस्तुत पुस्तिकेतील सूचनांचे प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य तर्हेने अनुसरण केले तर निश्चितपणे त्यांना आपल्या मनाची एकाग्रता वाढविण्यात यश मिळेल.
Contributors : Swami Purushottamananda, Dr. Ananta Adawadkar