Description
आपल्या शास्त्रग्रंथांतून, विशेषेकरून वेदान्तविषयक ग्रंथांमधून आणि अवतार-महापुरुषांच्या आदर्श जीवनातून प्रकट होणारी शाश्वत, चिरन्तन, हितावह अशी सत्ये, अजूनही सध्याच्या काळात वैज्ञानिक बुद्धीला पटणारी आणि कठोर तर्कांवर उतरणारी आहेत. वेदान्तप्रणित सत्याच्या प्रकाशात आपले मानवी जीवन व समाज एका उच्च स्तरावर उभा राहून आपले नैतिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक प्रश्न सहजपणे हाताळू शकतो आणि या द्वारे स्वत:च्या जीवनाला सार्थकता आणून पुढील पिढ्यांसाठी अमीट ठेवा सोडू शकतो. ह्याविषयी प्रस्तुत पुस्तकात श्रीमत् स्वामी रंगनाथानंदजी महाराज यांनी ऊहापोह केला आहे. हे पुस्तक 15 मे 1981ला ‘विवेकानन्द वेदान्त सोसायटी’ शिकागो येथे दिलेल्या व्याख्यानाचा मराठी अनुवाद होय.
Contributors : Swami Ranganathananda, Sri Narendranath Patil