श्रीसारदादेवी (Sri Saradadevi)

SKU EBM056

Contributors

P. G. Sahastrabuddhe, Swami  Apurvananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

309

Print Book ISBN

9789383751945

Description

श्रीसारदादेवी ह्या भगवान श्रीरामकृष्णांच्या लीलासहधर्मिणी होत. मानवजातीच्या उद्धारासाठी या मर्त्यलोकात भगवान जेव्हा अवतरतात तेव्हा प्राय: त्यांच्याबरोबर त्यांची शक्तिदेखील स्त्रीरूप धारण करून त्यांच्या लीलेत सहभागी होण्यासाठी आविर्भूत होत असते. वर्तमान युगात ही दिव्य शक्ती श्रीसारदादेवींच्या रूपात प्रकट झाली. भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याविषयी म्हणत, ‘‘ती साक्षात् सारदा आहे — सरस्वती आहे. ज्ञान देण्यासाठी ती आली आहे. … ती माझी शक्ती आहे.’’ स्वामी विवेकानंदांनी श्रीसारदादेवींचे — श्रीमाताजींचे — खरे स्वरूप ओळखले होते. त्यांना श्रीसारदादेवींच्या रूपात ‘जिवंत दुर्गा’ दिसत असे. या प्रत्यक्षानुभूतीच्या आधारावरच त्यांनी पुढील उद्गार काढले आहेत — ‘‘माताजींच्या जीवनाचे अपूर्व वैशिष्ट्य कोण समजू शकला आहे? कुणीच नाही. पण हळूहळू सर्वांना ते समजेल. ज्या शक्तिवाचून जगाचा उद्धार होऊ शकत नाही ती महाशक्ती भारतात पुन: जागृत करण्यासाठी माताजींचा आविर्भाव झाला आहे आणि त्यांच्या आदर्शाचे अनुसरण करून जगात पुन: एकदा गार्गी व मैत्रेयी यांच्यासारखी स्त्रीरत्ने उत्पन्न होतील.

Contributors : Swami  Apurvananda, P. G. Sahastrabuddhe