Description
हे पुस्तक भगवान श्रीरामकृष्णदेवांचे अंतरंगीचे संन्यासी पार्षद शशी महाराज — स्वामी रामकृष्णानंद यांचे जीवनचरित्र होय. प्रस्तुत पुस्तक हे पूजनीय श्रीमत् स्वामी प्रमेयानंद महाराजांनी लिहिलेल्या (संकलित केलेल्या) मूळ बंगाली पुस्तकाचा अनुवाद होय. पू. श्रीमत् स्वामी प्रमेयानंदजी महाराज, रामकृष्ण संघाचे उपमहाध्यक्ष होते. अनेकांच्या आग्रहाखातर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे हे पुस्तक पू. श्रीमत् स्वामी प्रमेयानंदजींच्या हयातीत प्रकाशित होऊ शकले नाही. स्वामी रामकृष्णानंदांच्या जीवनामध्ये आपल्या गुरूंविषयी असीम भक्ती दिसून येते. तसेच सेवाकार्यामध्ये देखील त्यांनी केलेला आत्मनियोग अनुसरणीय असाच आहे.
Contributors : Swami Prameyananda, Dr. N. B. Patil, Smt. Shakuntala Punde