Description
स्वामी अखंडानंद हे भगवान श्रीरामकृष्णांचे एक अंतरंगीचे लीलासहचर आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. श्रीरामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे ते तृतीय अध्यक्ष होते. त्यांचे दिव्य चरित्र म्हणजे श्रीरामकृष्णसंघाच्या ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्हिताय च’ या ध्येयवाक्याचे जणू काही प्रात्यक्षिकच होते. जीवन्मुक्ती आणि बांधवांची सेवा हे दोन्ही आदर्श त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष रूपात पाहावयास मिळतात. त्यांचे जीवन म्हणजे गीतेमधे सांगितलेल्या कर्मयोगाचे ज्वलन्त उदाहरणच होय. पावित्र्य, मानवप्रेम, सेवाभाव, देशबांधवांच्या उन्नतीविषयीची अत्यंत उत्कट तळमळ इत्यादी दैवी गुणांचा परमोच्च विकास त्यांच्या जीवनामधे आढळतो. असे हे सर्वांगसुंदर, परम पावन चरित्र सर्वांना, विशेषतः समाजसेवा व देशसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमोघ मार्गदर्शन करून नवीन शक्ती व नवीन स्फूर्ती देईल.
Contributors : Sri V. V. Kaduskar, Dr. Narendra B. Patil