स्वामी ब्रह्मानंदांच्या स्मृतिकथा (Swami Brahmandanchya Smruti Katha)

SKU EBM242

Contributors

Compilation, Smt. Shakuntala D Punde, Swami Chetanananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

491

Print Book ISBN

9789385858345

Description

श्रीरामकृष्ण म्हणत, ‘राखाल माझा मुलगा – मानसपुत्र – आहे.’ याचा गूढ अर्थ समजणे अत्यंत कठीण आहे. परंतु ‘एका ज्योतीने दुसरी अनुरूप ज्योत पेटविली जाणे’ हे जर या शब्दांचे तात्पर्य असेल तर पिता-पुत्र उभयतांना पाहण्याचे असीम सद्भाग्य ज्यांना लाभले आहे त्यांनाच, ‘राखाल माझा मुलगा आहे’ असे श्रीरामकृष्ण का म्हणत असत याची किंचित कल्पना येऊ शकेल. श्रीरामकृष्णांच्या या मानसपुत्राच्या घनिष्ठ संपर्कात जे आले होते ते म्हणतात की ‘महाराज’ (स्वामी ब्रह्मानंद) हे अमित-ब्रह्मतेजसंपन्न होते, वर्षाऋतूच्या अजस्र जलधारेप्रमाणे त्यांची बहुमुखी प्रतिभाशक्ती शतमुखांनी प्रवाहित होत असे. परंतु एवढे विलक्षण तेज, एवढी प्रचंड शक्ती या मृण्मय आधारामध्ये इतक्या शांतपणे कशी काय वसत असत हे गूढ कुणालाच कळत नसे. जो कुणी या पुरुषोत्तमाच्या पदप्रांती उपस्थित होई – मग तो साधू, ब्रह्मचारी वा भक्त असो अथवा व्यथेने पीडलेला, शोक-तापाने होरपळलेला व कलुषित जीवनाचे जड ओझे वाहत असलेला एखादा पतित जीव असो – प्रत्येकाला महाराजांच्या चरणांपाशी आपल्या जीवनाचे ईप्सित गवसत असे. त्यांच्यापाशी उपस्थित असताना त्यांच्या श्रीमुखातून वेळोवेळी साध्या संभाषणाच्या रूपात साधक जीवनाबद्दल उद्बोधक, गहन तत्त्वे अत्यंत सोप्या शब्दांत निसृत होत असत. त्यामुळे उपस्थितांच्या जीवनातील अनेक जटिल समस्यांचे सहज समाधान होत असे. महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश यांमुळे साधकांच्या मनात ईश्वरदर्शनाची तीव्र स्पृहा उत्पन्न होऊन त्यांच्यात साधनेविषयी प्रबळ उत्साह वाटत असे. स्वामी ब्रह्मानंदांच्या सहवासात आलेल्या अशा कित्येक साधकांनी – संन्यासी असो वा गृहस्थ – सर्वांनीच त्यांचे उपदेश आणि त्यांना प्रतीत झालेले महाराजांचे जीवन यासंबंधीच्या आठवणी टिपून ठेवल्या होत्या. या आठवणींची उपादेयता लक्षात घेऊन अमेरिकेतील सेंट लुईस येथील केंद्राचे अध्यक्ष स्वामी चेतनानंद यांनी बंगालीमधे ‘स्वामी ब्रह्मानंदेर स्मृतिकथा’ या नावाने संकलित करून ग्रंथरूपात प्रकाशित केल्या.

Contributors : Swami Chetanananda, Smt. Shakuntala D Punde, Compilation