Description
रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनचे तेरावे महाध्यक्ष स्वामी रंगनाथानंदजी महाराज जागतिक कीर्तीचे विद्वान आणि व्याख्याते होते. त्यांनी अमेरिकेतील संयुक्त संस्थाने व कॅनडा या देशांमध्ये जुलै 1968 ते डिसेंबर 1969 पर्यंत जो व्याख्यान-दौरा केला, त्याची तपशीलवार टिपणे लिहून ठेवली. त्यात विविध व्याख्यान दौर्याचा वृत्तांत तर आहेच, याखेरीज चर्चासत्राचे वृत्त, वर्तमानपत्रातील बातम्या, त्यांचा त्यासंबंधी पत्रव्यवहार आणि अद्वैत आश्रम, कोलकाता येथील प्रश्नोत्तराचे उद्बोधक सत्रसुद्धा अंतर्भूत केले आहे.
Contributors : Swami Ranganathananda, Dr. Suruchi Pande