महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद (Maharashtrat Swami Vivekananda)

SKU EBM143

Contributors

Sri Manoharrao Dev, Swami Videhatmananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

288

Print Book ISBN

9789384883126

Description

भगवान श्रीरामकृष्णांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या कृपाप्रसादाने एकमेवाद्वितीय परमात्म्याचा साक्षात्कार लाभून अलौकिक प्रतिभा संपन्न नरेंद्रनाथ ‘महामानव’ झाले. अमेरिकेत इ.स. 1893 साली शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत ‘दिग्विजय’ मिळविण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी भारतात पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण सर्वत्र भ्रमण केले. त्यावेळी त्यांनी सारा भारतवर्ष आपल्या प्रज्ञाचक्षूंनी अवलोकन केला. ह्याच काळात एक परिव्राजक अज्ञात संन्यासी म्हणून स्वामीजींनी महाराष्ट्रातही भ्रमण केले होते. तरीही त्यांचे देदिप्यमान, असामान्य व्यक्तिमत्त्व झाकून राहू शकले नाही. श्रीरामकृष्णांनी नेमून दिलेले धर्मजागृतीचे व समाज-प्रबोधनाचे कार्य त्यांना करायचे होते; आणि ते त्यांनी आपल्या परिव्रजन काळापासूनच उत्स्फूर्तपणे केले आहे. स्वामीजींच्या महाराष्ट्रातील परिभ्रमणाचा तपशीलवार शोध स्वामी विदेहात्मानंदांनी अनेक जुनी पुस्तके, वृत्तपत्रे, काही व्यक्तींच्या आठवणी व दैनंदिन्या यांच्या आधारावर हिंदी भाषेत लिपीबद्ध केला होता. त्यांच्या ह्या मूळ हिंदी लेखांचा श्री. मनोहरराव देव यांनी सरळ, सोप्या मराठीत अनुवाद केला आहे. प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या, मुख्यत्वेकरून महाराष्ट्रातील परिभ्रमणाचे वर्णन जरी असले, तरी कुठे कुठे बृहन्महाराष्ट्रातील काही ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यक्तींशी झालेल्या भेटींचा तपशीलही आला आहे. म्हणून परिव्राजक रूपात महाराष्ट्रात व अन्यत्र फिरताना स्वामी विवेकानंदांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव देशभक्त, क्रांतिकारक, समाजसुधारक, लेखक, सुविख्यात गायक, कलाकार अशा अनेक नामांकित मराठी व्यक्तींवर कसा पडला याचा विवेचनात्मक इतिहास इथे दृग्गोचर होईल..

Contributors : Swami Videhatmananda, Sri Manoharrao Dev