स्वामी प्रेमानंदांच्या सहवासात (Swami Premananda Yanchya Sahavasat)

SKU EBM162

Contributors

Swami Omkareshwarananda, Swami Yogatmananda

Language

Marathi

Publisher

Ramakrishna Math, Nagpur

Pages in Print Book

166

Description

आपल्या ज्या शिष्यांचा श्रीरामकृष्ण ‘ईश्वरकोटी’ म्हणून उल्लेख करीत असत त्यातील स्वामी प्रेमानंद हे एक होत. स्वामी प्रेमानंद म्हणजे जणू घनीभूत पावित्र्य. श्रीरामकृष्ण म्हणत : ‘बाबूरामाची हाडे देखील पवित्र आहेत!’ साधना व तपस्या यात निगम्न असलेल्या स्वामी प्रेमानंदांच्या जीवनात इ.स. 1898 पासून युगप्रयोजनानुसार एक नवीन अध्याय सुरू झाला. नवप्रतिष्ठित रामकृष्ण-संघाच्या प्रथम आलमबाझार येथील व पुढे बेलुर मठातील मुख्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वामी विवेकानंदांनी आपल्या या प्रिय गुरुबंधूवर सोपविली. स्वामी प्रेमानंदांनीही ती समर्थपणे पेलून आपल्या या दिव्य जीवनाने व अमृतमय वाणीने मठातील नवागत साधकांची व गृहीभक्तांची जीवने, त्यांनी श्रीरामकृष्ण-विवेकानंदांच्या भावादर्शाच्या मुशीत घालून घडविण्यास सुरुवात केली. या काळातील मठातील साधू व येणारे भक्तजन प्रेमानंदांच्या प्रेमप्रवाहात सुस्नात होत, त्यांच्या प्रासादिक वचनांचे पान करीत व त्यातील दिव्य अमृतकण लाभून तृप्त होत. यातील बहुतेक प्रसंग बेलुर मठातील तेव्हाच्या मंदिराच्या पूर्वेस असणार्या इमारतीतील अतिथि-कक्षात घडले आहेत. काही या कक्षाला लागून असलेल्या गंगेसमोरच्या व्हरांड्यातील आहेत.

Contributors : Swami  Omkareshwarananda, Swami Yogatmananda